
एम एल सी श्री हणमंत निरानी यांनी स्वामी विवेकानंद विद्यालय खानापूरला भेट देऊन खानापूर तालुक्यातील सर्व अनुदानित शाळांना संगणक प्रणाली व स्कॅनरचे वाटप केले.

स्वामी विवेकानंद शिक्षण सेवा सोसायटीचे अध्यक्ष अँड.चेतन अरुण मणेरीकर यांनी SSVSS सोसायटीच्या वतीने आमदार श्री हणमंत निरानी यांचे स्वागत करून सत्कार केला यावेळी उपस्थित असलेले खानापूर तालुक्यातील भाजपाचे नेतेमंडळी व खानापूर तालुक्यातील सर्व अनुदानित शाळांच्या प्रतिनिधींचेही स्वागत करण्यात आले, श्रीमती राजश्री कुडची, बीईओ यांनी गवळी, अबनाळी, जामगाव या दुर्गम भागातील गावातील शिक्षकांच्या समस्या सांगितल्या, यावेळी जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष श्री संजय कुबल, बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व माजी आमदार श्री अरविंद पाटील, यांची भाषणे झाली. कार्यक्रमाला भाजपा नेते श्री विठ्ठल हलगेकर, भाजपा जेष्ठ नेते बाबुराव देसाई, भाजपा युवा नेते पंडीत ओगले, सदानंद कपिलेश्वरी, सेक्रेटरी गुंडू तोप्पीनकट्टी, कदम सर, सलीम सर, आदिजन उपस्थित होते,

