
खानापूर : येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आपल्याला उमेदवारी देण्यात यावी यासाठी मार्केटिंग सोसायटीचे माजी चेअरमन व गर्लगुंजी ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष गोपाळ पाटील व गर्लगुंजी गावचे मार्केटिंग सोसायटीचे माजी चेअरमन व तालुका पंचायत चे माजी सदस्य पांडूरंग सावंत यांनी आपला अर्ज मए समितीचे तालुका अध्यक्ष गोपाळराव देसाई कार्याध्यक्ष यशवंत बिरजे सेक्रेटरी सिताराम बेडरे यांच्याकडे आज अर्ज सुपूर्द केला

यावेळी विकास बेळगावकर,निरंजन सरदेसाई, प्रकाश चव्हाण, शंकर पाटील, सी एस पवार, तसेच गर्लगुंजी गावचे ज्येष्ठ नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते,
गोपाळ पाटील हे समितीचे जुने ज्येष्ठ कार्यकर्ते असून समितीच्या प्रत्येक आंदोलनात,सत्याग्रहात ते सामील होत असतात त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला असून गर्लगुंजी ग्रामपंचायतचे चेअरमन म्हणून अतिशय चांगली कामगिरी केली आहे तसेच मार्केटिंग सोसायटीचे चेअरमन म्हणूनही अत्यंत चांगल्या पद्धतीने धुरा सांभाळली आहे तसेच तालुक्यात भाजपची हवा असताना तालुक्यातील सहा झेडपी पैकी एक गर्लगुंजी झेडपी मधुन आपल्या पत्नीला निवडून आणले होते सहा जागापैकी केवळ एकमेव जागा त्यावेळी समितीला गोपाळराव पाटील यांनी आपल्या व समितीच्या प्रयत्नांने निवडून आणली होती,
यावेळी त्यांच्यासोबत अर्ज भरलेले गर्लगुंजी गावचे सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग सावंत हे सुद्धा मार्केटिंग सोसायटीचे चेअरमन म्हणून जबाबदारी अत्यंत चांगल्या रीतीने पार पाडली होती तसेच ते तालुका पंचायतीच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून तालुका पंचायत सदस्य म्हणून निवडून आले होते
