
खानापूर भू विकास बँकेचे चेअरमन मुरलीधर गणपतराव पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष यशवंत बीर्जे, सेक्रेटरी सीताराम बेडरे व समितीच्या पदाधिकाऱ्यांच्याकडे दाखल केला,

मुरलीधर पाटील हे जळगे गावचे समीतीचे जेष्ट जुने कार्यकर्ते व नेते प्रत्येक सीमा चळवळीत सक्रिय भाग घेतलेले सीमा सत्याग्रही कै गणपतराव पाटील यांचे सुपूत्र असुन मुरलीधर पाटील सुध्दा समितीच्या प्रत्येक चळवळीत सक्रिय भाग घेत असतात व तालूक्यात त्यांचा जनसंपर्क सुध्दा चांगला आहे,

उमेदवारी अर्ज दाखल करताना खानापूर तालुका कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष सुभाष चलवादी, मल्लिकार्जुन मुतगी, विष्णू बेळगावकर, रमेश पारसेकर, भू विकास बँकेचे व्हा. चेअरमन विरुपाक्ष पाटील, नारायण पाटील, सुरेश गावकर, कुतुबुद्दीन बिच्चन्नवर, विठ्ठल कुंभार, ज्योतिर्लिंग पतसंस्थेचे चेअरमन प्रभाकर पाटील, नागेश पाटील, मुरलीधर गुरव, मारुती पाटील, अशोक पाटील, तोपिनकट्टी, मनोहर नंदाळकर, नारायण विष्णू , प्रेमानंद पाटील, इराप्पा पाटील, हुवाप्पा पाटील, शामराव पाटील, विठ्ठल ठाकर व आदि कार्यकर्ते व नेतेमंडळी उपस्थित होते,
