
लोकोळी : खानापूर तालुक्यातील लोकोळी – जैनकोप श्री महालक्ष्मी यात्रेला हजारो लोकांच्या उपस्थित आज पहाटे सकाळी धार्मिक विधी, कार्यक्रम, व 6-30 वाजता अक्षतारोपण होऊन विवाह संपन्न होवुन यात्रेला सुरूवात झाली, यावेळी खानापूर तालूक्याचे माजी आमदार बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अरविंद पाटील सह पत्नी उपस्थित होते, यावेळी भाजपा नेते प्रमोद कोचेरी, विठ्ठलराव हलगेकर, व अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते,

खानापूर तालुक्यातील सर्व भागातून व गावातून तसेच हल्याळ, रामनगर, बेळगाव, भागातून हजारो लोक उपस्थित होते, आज दिवसभर लोकोळी व जैनकोप गावात महालक्ष्मी फिरवण्यात येवुन सायंकाळी गदगेवर महालक्ष्मी बसणार आहे,

