
खानापूर ता. 28: विकासाच्या नावाखाली निसर्ग संपदेने नटलेल्या कणकुंबी भागाचे लचके तोडनाऱ्या कर्नाटक शासनापासून भागाचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांना मत द्या. असे आवाहन माजी जिल्हा पंचायत सदस्य विलास बेळगावकर यांनी केले.

कणकुंबी, चीगुळे, पारवाड, बेटने, कालमनी, आमटे भागात समितीचा प्रचार दौरा शुक्रवारी संपन्न झाला. कणकुंबीत कोपरा सभा झाली त्या प्रसंगी ते बोलत होते. सकाळी जांबोटीत समितीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या हस्ते झाले.
कणकुंबीत शेकडोंच्या संख्येने जमलेल्या समिती कार्यकर्त्यानी माउली देवीचे दर्शन घेउन गावात पत्रके वाटली.
रणजित पाटील म्हणाले, समिति आमचे कुळ आहे. त्यांच्याशी प्रामाणिक राहिल्यास आपले घर अबाधित राहते. राष्ट्रीय पक्ष वेगवेगळी आमिष दाखवतील त्याला नभुलता समितीला मत देउन आपले घर राखुया असे विचार त्यांनी मांडली.
चळवळीचा घात करुण राष्ट्रीय पक्षासी संधान बांधलेल्या गद्दराने समितीच्य्या विरोधत गरळ ओकली आहे. समितीचा उमेदवार निवडून आणून त्याला चोख प्रत्युत्तर देऊया असे विचार आबासाहेब दळवी यांनी मांडले.
जांबोटी कणकुंबी भागतील भाषा आणि परंपरा समितीमुळे अबाधित आहे . कानडी कारणाचा वरवंटा जोराने फिरतो असून आमच्या शाळा बंद पाडण्याचा डाव आखला जातो आहे . हे थांबवायाचे असल्यास मुरलीधर पाटील यांना नेतृत्व करण्याची संधी द्या असे आवाहन माजी जि प सदस्य जयराम देसाई यांनी केले.
या भागाने खऱ्या अर्थाने सीमा चळवळ तेवत ठेवली आहे. सद्या न्यायालयात प्रलंबित असलेला खटला निर्णया पर्यन्त आहे अशा स्थितीत आपले मराठी अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी समितीला मत द्या अशी विनंती मुरलीधर पाटील यांनी केली.
यावेळी राजाराम गावडे, विलास नाईक, अरुण नाईक, मारूती परमेकर, शिवजी सडेकर, नामदेव गावकर, शंकर सडेकर, पुंडलिक कांबळे, कृष्ण देसाई, रवी देसाई, नारायण गुरव, विजय गुरव, विठोबा नेवरेकर, राजाराम देसाई,नारायण शिंदे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
