
खानापूर : महाराष्ट्र एकीकरण समीतीचे खानापूर तालुक्याचे अधिकृत उमेदवार म्हणून जळगे गावचे सीमा सत्याग्रही कै गणपतराव पाटील यांचे सुपुत्र मुरलीधर गणपतराव पाटील यांचे नाव समीतीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनी जाहीर केले,
यावेळी समीतीचे जेष्ठ नेते माजी आमदार दिगंबरराव पाटील, कार्याध्यक्ष यशवंतराव बीर्जे, सचीव सीताराम बेडरे, खजीनदार संजय पाटील व जेष्ठ सीमासत्याग्रहींच्या उपस्थितीत अधिकृतपणे व सर्व समंतीने जाहीर केल्याने समितीच्या कार्यक्रत्यात व मतदारसंघात नवचैतन्य पसरले असून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे,

महाराष्ट्र एकीकरण समितीकडे दोन दिवसांपूर्वी अनामत रक्कम व प्रतिज्ञा पत्र सादर केलेले 7 पैकी 5 उमेदवाराची मुलाखत घेण्यात आली होती व त्यात 5 जणांनी एकत्र बसून चर्चा करून सर्वसंमतीने उमेदवार म्हणून एकाची नीवड करण्यासाठी सांगण्यात आले होते पण त्यामध्ये एका नावावर सर्व सहमती झाली नसल्याने म ए समितीच्या कार्यकारीणी सदस्यांचे मतदान घेऊन उमेदवाराची निवड करण्याचे जाहिर केले असता इच्छुक उमेदवार व म ए समीतीचे जेष्ठ नेते माजी जिल्हा परिषद सदस्य विलासराव बेळगांवकर यानी यातून माघार घेतली असता शेवटी 4 उमेदवारच शिल्लक राहिले,

म ए समीती कार्यकारीणी सदस्यांनी मतदान करून उमेदवाराची निवड केली,
इच्छुक चार उमेदवार मुरलीधर गणपतराव पाटील, निरंजन उदयसिंहराव सरदेसाई, आबासाहेब दळवी, रूक्माणा जुंझवाडकर यांच्या नावाची यादि बनविण्यात आली व त्यावर कार्यकारिणी सदस्यांचे मतदान घेण्यात आले असता मुरलीधर पाटील यांना सर्वात जास्त मते पडल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनी त्यांचे नाव जाहीर केले असता सर्वांनी त्यांना पुष्पहार घालून त्यांचे अभिनंदन केले व विधानसभेची निवडणूक सर्वांनी एकजुटीने कार्य करून मुरलीधर पाटील यांना निवडून आणण्याची शपथ घेतली त्यानंतर राजा शिवछत्रपती शिव स्मारक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला माला अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्रकीकरण समितीचे युवा व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी एकच गर्दी केली होती व उपस्थित कार्यकर्त्यात नवचैतन्य व आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते,

