
खानापूर : महाराष्ट्र एकीकरण समितीकडे आज एकूण सात इच्छुक उमेदवारांपैकी पाच जणांनी आपापले आर्ज, प्रतिज्ञा पत्र, व अनामत रक्कम सादर केली,
आज म ए समीतीचे युवा नेते निरंजन सरदेसाई, मुरलीधर पाटील, आबासाहेब दळवी, विलासराव बेळगावकर, रूक्माणा जुंझवाडकर या पाच जणांनी प्रतिज्ञा पत्र, अनामत रक्कम, व अर्ज महाराष्ट्र एकीकरण समीतीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष यशवंत बीर्जे, सचीव सीताराम बेडरे, खजिनदार संजय पाटील व व पदाधिकाऱ्यांच्याकडे सादर केले आज दुपारी एक पर्यंत अर्ज सादर करण्यासाठी वेळ देण्यात आली होती परंतु सात इच्छुकापैकी पाच जणांनीच अर्ज प्रतिज्ञापत्र व अनामत रक्कम सादर केली असल्याने मागील महिन्यात इच्छुक म्हणून अर्ज दाखल केलेल्या सात पैकी दोघे इच्छुक उमेदवार गर्लगुंजी गावचे नंदगड मार्केटिंग सोसायटीचे माजी चेअरमन व गर्लगुंजी ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष गोपाळराव पाटील व नंदगड मार्केटिंग सोसायटीचे माजी चेअरमन व माजी तालुका पंचायत सदस्य पांडुरंग सावंत यांनी आपले अर्ज सादर केले नाहीत त्यामुळे सध्या या पाच जणांमधूनच एकाची महाराष्ट्र एकीकरण समितीचा विधानसभेचा उमेदवार म्हणून निवड होणार आहे,
