
खानापूर : येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आपल्याला उमेदवारी देण्यात यावी यासाठी समितीने जेष्ठ नेते माजी जिल्हा परिषद सदस्य विलासराव बेळगावकर कुसमळी, यांनी आपला अर्ज मए समितीचे तालुका अध्यक्ष गोपाळराव देसाई कार्याध्यक्ष यशवंत बिरजे सेक्रेटरी सिताराम बेडरे यांच्याकडे आज सुपूर्द केला

यावेळी प्रकाश चव्हाण, कृष्णा मन्नोळकर, नारायण कापोलकर, सूर्यकांत बाबशेट, व आदि नेतेमंडळी, नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते,

विलासराव बेळगावकर हे समितीचे जेष्ठ नेते असुन आपली शीक्षकी नोकरी सोडून ते सीमा प्रश्न अंदोलनात व सत्याग्रहात सामील झाले आहेत, एकवेळ समितीचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून सुध्दा आले होते, मागील विधानसभा निवडणुक समितीचे उमेदवार म्हणून निवडणुक लढवली होती, योगायोगाने आज त्यांचा वाढदिवस असुन माजी आमदार दिगंबरराव पाटील व समितीच्या नेतेमंडळींनी व कार्यकर्त्यांनी त्यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या,
