
खानापूर : जटगे ता. खानापूर येथे रविवार दि. 22 जानेवारी 2023 रोजी सकाळी ठीक 900 वा. उद्देश , शिक्षणाबरोबर अभ्यास खेळ योग व्यायाम कला सर्व स्पर्धांची आवड व्हावी, व मानसिक, शारीरिक, सांघिक, एकाग्रता वाढवणे .जिद्द ,चिकाटी,कला, कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी भव्य ओपनमॅरेथॉन स्पर्धा ठेवण्यात आली असून पहिली ते चौथीच्या विद्यार्थी साठी 200 मीटर, पाचवी ते सातवीसाठी 400 मीटर, आठवी ते दहावी 800 मीटर, तसेच खुल्या गटासाठी ओपन स्पर्धा पंधराशे मीटर, सीनियर सिटीजनसाठी हजार मीटर स्पर्धा ,शाळेच्या क्रीडांगणावर विश्वभारती कला क्रीडा संघटना बेळगाव यांच्यामार्फत आयोजित करण्यात आली आहे .तरी आपण कापोली ग्रामपंचायत हद्दीतील क्रीडापटूंनी याचा अवश्य लाभ घ्यावा. असे संयोजकांनी कळविले आहे,
कापोली ग्रामपंचायत व्याप्तीतील
स्पर्धकांनी आपल्या शिक्षक व पालकांसोबत येवून आपापल्या जबाबदारीवर धावण्याचे आहे
असे आवाहन विश्वभरती कला क्रीडा फाउंडेशन लोंढा विभाग चे कार्याध्यक्ष श्री कृष्णा खांडेकर व रमाक्का हानंबर यांनी केले आहे
