
श्री दत्त पद्मनाभ पीठ श्रीक्षेत्र तपोभूमी गुरुपीठाचे पीठाधिश्वर पद्मश्री विभूषित धर्मभूषण “सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी” महाराजांच्या आशीर्वादाने “- संत समाज खानापूर झोन- “आणि “- सद्गुरु होमिओकेअर -” यांच्या संयुक्त आयोजनाने “- मराठा मंडळ संस्थेच्या कला आणि वाणिज्य पदवीधर महाविद्यालय खानापूर”- येथे “पीसीओडी आणि वुमन्स हेल्थ विथ होमिओपॅथी” या विषयावर डॉ गौरेश भालकेकर यांचे आरोग्य विषयक सुश्राव्य व्याख्यान सुसंपन्न झाले.

आशिया खंडात 50% हून अधिक महिला या आजाराने ग्रस्त आहेत आणि आत्ताची तरुण पिढी या रोगाला अधिक बळी पडत आहे याचसाठी जागरूकता म्हणून या आजाराबद्दल महाविद्यालयाच्या तरुणींना विशेष मार्गदर्शन करण्याची गरज आहे असे प्रतिपादन डॉ.गौरेश भालकेकर यानी केले.योगाचार्य वैजू गुरव यांनी योगा आणि उत्तम आहार पद्धती याबद्दल सविस्तर माहिती सांगितली.

व्यासपीठावर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जयश्री बागेवाडी सहित प्रो. व्ही एम तीर्लापूर ( नॅक कोऑर्डिनेटर), महाविद्यालयीन प्राध्यापिका,श्री जोतिबा पाटील( सचिव) उद्योजक निवृत्ती पाटील, योगाचार्य वैजू गुरव, सौ.साक्षी पाटील (खजिनदार,संत समाज कुपटगिरी) तसेच विद्यार्थीनी उपस्थित होत्या.प्रोफेसर पी.जी भातकांडे यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले आणि प्रो. डॉ.राजश्री तीरवीर यांनी आभार प्रदर्शन केले.
