
आज हलशी येथे साहित्य रंग महोत्सव सोहळ्याचे आयोजन. साहित्यिक व सिने अभिनेते उपस्थित राहणार.
खानापूर ; आज रविवार दिनांक 16 मार्च 2025 रोजी हलशी येथील कदंबा साहित्य परिषदेने नृसिंह मंदिर समोरील पित्रे भवन या ठिकाणी सायंकाळी चार वाजता “साहित्य रंग महोत्सव सोहळा” आयोजित केला आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध चित्रपट कलाकार, महनीय कवी यांच्या कार्यक्रमा सोबत जादूचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून, याचा लाभ घेण्याचे आवाहन कदंब साहित्य परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
कदंबा साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या साहित्य रंग महोत्सव सोहळ्याला खालील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यांचा थोडक्यात परिचय.
सिने अभिनेते शिवरामप्रसाद त्रिंबक पंडित…

शिवराम प्रसाद पंडित यांचे मुळगाव खानापूर तालुक्यातील लोंडा येथील असून त्यांचे शिक्षण B.Sc. (GSS college बेळगाव), DBM. येथे झाले आहे. या क्षेत्रात त्यांनी 40 वर्षांहून अधिक कार्य केले आहे. 30 पेक्षा अधिक धारावाहिक व चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.
आभाळ माया, समान्तर, किमयागार, दामिनी, छत्रपति शिवाजी महाराज, हारजीत, चिरंतन, कुंकू, स्वप्रांच्या पलीकडे, दुर्वा माझे मन तुझे झाले, तू माझा सांगाती (मध्ये एकनाथ महाराज यांची भूमिका, लेक माझी लाडकी, स्वाभिमान, सुंदर आमचे घर दूरदर्शनवर मर्म बंधातली ठेव ही, हारजीत, चिरंतन, हसण्यावारी घेऊ नका, या प्रमुख आणि इतर हिंदी धारावाहिक अमानत, इत्तेफाक (opp राजेश खत्रा main villian), सर्वगुणसंपन्न (main charachter role. balaji Telefilms), मधुबाला, कारावास, सिद्धि, विरासत, अकबर बीरबल आणि बाकी हिंदी टेलीफिल्मः कुरुक्षेत्र धर्मक्षेत्र यामध्ये कार्य केले आहे. तसेच उत्कृष्ट नायक म्हणून नॅशनल अवॉर्ड साठी त्यांना nomination सुद्धा करण्यात आले होते.
हिंदी फिल्म्स: हत्यार (संजय दत्त के साथ), धुप (ओम पूरी बरोबर), हल्लाबोल (अजय देवगण बरोबर), चैतन्य महाप्रभु (main character role)
मराठी फिल्म्स :; सत्वपरीक्षा, घे भरारी, आता मी कशी दिसते, no problem, साने गुरूजी, night school, प्रेमसूत्र, मोहन आवटे (best character role award), रात्र आरंभ, पिंडदान, बारायण, बाकी तसेच अनेक चित्रपटात काम केले आहे.
मराठी नाटक ; गुड बाय डॉक्टर, अश्रुचि झाली फुले, घडायचं होतं वेगळच, मी माझ्या मुलांचा, काशीचक्र, तिची कहाणी खरच माझ्यासाठी, घरोधरी, आनंदतरंग, फायनल डिसीजन, बाकी तसेच अनेक मराठी नाटक लेखन आणि दिग्दर्शन घडायचे होते वेगळेच, आनंदतरंग, एक माऊ चार भाऊ, इन्स्पेक्शन, कामासाठी वाटेल ते आणि हसत हसत जगायचे.
लेखन : पुलाखाली काही सर्वात श्रीमंत माणसे, सत्तरी रेsss, let’s celebrate आणि साबण, (साबणला अटल करंडक, मुंबई.. 2022 साल, 125 एकांकीकां मधे लेखन प्रथम पारितोषिक आणि सादरीकरणा में 4 प्रमुख केंद्रां मध्ये प्रथम पारितोषिक प्राप्त.)
मराठी फ़िल्म दिग्दर्शन / कथा/पटकथा/संवाद- आजोबा वयात आले। हा सिनेमा 2008 साला मधे बेस्ट फिल्म of the year nominat झाला होता. समिन्दर की रानी या हिंदी टेलीफिल्मच्या पटकथा संवाद साठी 2006 चा राष्ट्रिय पुरस्कार मिळाला आहे.
इंग्लिश फिल्म : डॉ. बाबासाहेब आंबेडकर, परझेनिया यात चरित्र अभिनेता म्हणून कार्य केले आहे.
हॉलीवूड फिल्म : The Sanyasi, played an imp. character role of an advocate. Web series hindi- revadi 1962 (heroines father-director Mahesh manjarekar. City of dreams 2 आणि city of dreams 3- underworld don.. director..Nagesh kuknoor Mumbai times.. home minister
काव्य संग्रह: अमृततिर्थ आणि स्वरूप मंदिरची निर्मिती.. या मंदिराला कर्नाटक सरकार ने Tourism Centre of Karnataka म्हणून declare केले आहे. सर्व स्तरातून हे मंदिर पहायला लोक येतात. (हे वाचले नाही तरी चालेल) तू तोच मी.. या पुस्तकाचे लेखन केले असून (प्रकाशक ग्रंथोली प्रकाशन मुंबई) हे आहेत.
सिने अभिनेते व साहित्यिक शशिकांत दत्तात्रेय गंधे..

शशिकांत दत्तात्रय गंधे यांचे (वय 74 वर्षे) असून SSC जुनी मॅट्रिक, डिप्लोमा इन इंजिनिअरिंग 2 रे वर्ष पूर्ण झाले आहे.
छंद – स्केचिग, पेंटिंग, कॅलिग्राफी, वाचन, संगीत ऐकणे, विविध प्रेक्षणीय स्थळे पाहणे. 1983 पासून आजपर्यंत कला क्षेत्रात कार्यरत आहे.
अनुभवः 21 मराठी plys, 75 मराठी 50 हिंदी / मालिका 50 जाहिरात चित्रपट, 30 मराठी चित्रपट, 6 हिंदी चित्रपट 5 लघुपट, 5 अल्बम,
नाटके – सूर्याची पिल्ले, लेकुरे, निष्पाप, बेबी, पती गेले ग काठेवाडी, शंभूराजे, थेंब थेंब आभाळ इ.इ.
चित्रपट – वेध, एप्रिल फूल, शोध, मध्यमवर्ग, लगन द डेडिकेशन, किंग आफ बॉलीवूड, सेकंड इनिंग, दुःखाचे श्वापद, गांधी माय फादर इ.इ.
मराठी मालिका – दामिनी, बंदिनी, रंग माझा वेगळा, काना मागुन आली, अस्मिता, कृपासिंधू, लक्ष्य, स्वप्नांच्या पलिकडले, संत गजानन शेगावचे, गुलमोहोर, सुखाच्या सरींनी हे मन बावरे, माझे पती सौभाग्यवती इ.इ.
हिंदी मालिका – अजनबी, कहानी, कसौटी, के स्ट्रीट पाली हिल (बालाजीचे सर्व 11 शो) इन्साफ, सुकन्या, कर्तव्य, खुशी (मनीष गोस्वामीचे सर्व 11 शो) शायद तुम, नीली छत्री वाले, हर शाखपे उल्लू, बुरे भी हम भले भी हम, वागले की दुनिया, उडान, ना आना इस देस लाडो चंद्रकांत चिपळूणकर सिडी बंबावाला.
अल्बम- पहिला इंडिन आयोडल – संगीत गुरू. कुणी म्हणाले – सौ. फडणवीस मॅडम गाणे, ॲड फिल्म्स झेन मोबाइल, ट्रॅक्टर्स, सूर्या पेंट्स, सिंटलेटिंग ज्वेलरी, झंडू नित्यन टॅब, अश्वगंधा, इ.इ.
• प्रा. डॉ. चंद्रकांत भगवंत पोतदार

प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत भगवंत पोतदार यांचे शिक्षण एम.ए. पीएच.डी. (मराठी) मधून झाले असून, कवी ग्रेस यांच्या साहित्याचा अभ्यास शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर 2007
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, हलकणीं, ता. चंदगड, जि. कोल्हापूर येथे गेली ३२ वर्षे मराठीचे अध्यापन करत आहेत.
आत्म्याचा अभंग, तरीही सोबतीला असतात श्वास, स्वप्नांच्या पडझडीनंतर हे तीन कवितासंग्रह प्रकाशित करण्यात आले आहेत.
आस्वादाची काही पाने, मौनातले अक्षरधुके, सृजनगंध, अक्षरलिपी, परिघाच्या रेषेवर, प्रहराच्या ऐरणीवर हे सहा समीक्षाग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. निवडक ज्ञानेश्वर कोळी, प्रकाशवाटेवरच्या कविता, शोधयात्रा, वर्तमान पिढीचे संदर्भ, निःशब्द शब्द हेच पाच संपादन ग्रंथ प्रसिद्ध.
आई कै. सत्यभामा भगवंत पोतदार यांच्या स्मरणार्थ ‘श्रीशब्द’ काव्यपुरस्काराचे आयोजन. आकाशवाणी सांगली, कोल्हापूर, व सह्याद्री दूरदर्शनवरून अनकेदा कवितावाचन, कवी संमेलनासाठी निमंत्रित कवी व सूत्रसंचालनात सहभाग. ‘धनगरवाडा’ चित्रपटात अभिनेते सदाशिव अमरापूरकरांसोबत भूमिका. केंद्रशासन पुरस्कृत हिंदी भाषिक लेखन शिबिरात सहभाग, बंडलागुडा, हैद्राबाद.
संस्थापक अध्यक्ष, स्फूर्ती साहित्य संघ, नेज, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर. कार्यकारिणी सदस्य, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर. सदस्य, संत नरहरी सोनार अध्यापन, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर.
कार्यकारिणी सदस्य, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर. सदस्य, मराठी अभ्यास मंडळ, कर्नाटक विद्यापीठ, धारवाड. सदस्य, मराठी अभ्यास मंडळ, सद्गुरू गाडगेमहाराज कॉलेज, कराड (स्वायत्त)
• सहसंपादक, दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिका कोल्हापूर.
• कवितासंग्रह, संपादन, समीक्षा अशा अनेक ग्रंथांना राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार प्राप्त.
प्रेमानंद जादुगार यांचा परिचय….

मूळचे कसबा नंदगड मधील (ता. खानापूर) व सध्या गोव्यातील रहिवासी प्रेमानंद नारायण पाटील ऊर्फ जादूगार प्रेमानंद यांना गोव्याचा कलागौरव 2021-22 चा पुरस्कार मिळाला आहे.
जादूगार प्रेमानंद यांनी दहावीचे शिक्षण घेतल्यानंतर नोकरीसाठी गोवा गाठले. नोकरी करीत असताना गोव्यातील गणेशोत्सव व इतर कार्यक्रमांमध्ये जादूचे प्रयोग सुरु केले. त्याला प्रतिसाद मिळू लागल्यानंतर त्यांनी नवनवीन जादूच्या प्रकारांचे प्रशिक्षण घेतले. आजपर्यंत त्यांनी जादूचे 4,048 प्रयोग केले आहेत. त्यात व्यक्तीच्या शरीराचे दोन भाग करणे, स्टेजवरुन अदृश्य होऊन प्रेक्षकांत प्रकट होणे. भुतांचा डान्स, अधांतरी तरंगणारे नवीन पद्धतीचे माईंड रीडिंग अशा अनेक लोकप्रिय प्रयोगांचा
समावेश आहे. आपल्या प्रयोगातून ते अंधश्रद्धा निर्मुलन, बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ, स्वच्छ भारत अभियान, व्यसनमुक्ती अभियान आदींचा प्रचारही करतात. देश-विदेशात त्यांनी जादूचे प्रयोग सादर केले आहेत.
गेल्या चाळीस वर्षात सादर केलेल्या जादुच्या प्रयोगामुळे त्यांना बँकॉक, सिंगापूरसह विविध ठिकाणच्या संस्थांकडून पाचशेहून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. त्यात इंटरनॅशनल क्रिएटिव्ह स्टार, नेशनल प्रतिभा अभियान सेवा, आशिया अरब बेस्ट मॅजिशियन, मा तुझे सलाम, आदर्श कलारत्न गौरव, मॅजिक करिष्मा गाला परफॉर्मन्स, मस्त इनोव्हेटिव्ह परफॉर्मन्स, इंटरनॅशनल गाला, लाईफ टाईम अचिव्हमेंट आदी पुरस्कारांचा समावेश आहे. प्रेमानंद हे उत्तम मूर्तिकार, चित्रकार व कबड्डीपट्ट आहेत. कोरोना काळात त्यांनी सामाजिक कार्यही केले आहे. त्यांचे कुटुंबही जादूचे उत्तम प्रयोग करतात. या कामात त्यांना पत्नी नीता, मुलगा अक्षय व कन्या श्वेता यांची साथ लाभली आहे.
