
अपात्र नगरसेवक महापौर झाला! अभय पाटील यांच्या प्रयत्नांना यश! नगरसेवकांच्या अपात्रतेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली!
महानगरपालिकेचे व्यावसायिक आउटलेट आपल्या पत्नींच्या नावाने घेतल्याच्या तक्रारीवरून बेळगाव महानगरपालिकेचे नगरसेवक मंगेश पवार आणि जयंत जाधव यां दोघांचे महिनाभरापूर्वी नगरसेवक पद (सदस्यत्व) अपात्र ठरविण्यात आले होते. त्यामुळे या दोघां नगरसेवकांनी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली आव्हान देत, बेंगलोर येथील उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यासाठी आमदार अभय पाटील हे तीन दिवस बेंगलोर येथे तळ ठोकून मुक्कामाला होते. तसेच आमदारांनी या कार्यासाठी बेंगलोर मधील उच्च न्यायालयाच्या दोन ज्येष्ठ तज्ञ वकिलांची नेमणूक केली होती. त्यामुळे या गोष्टीला न्यायालयात यश आले. व निवडणुकीच्या दोन दिवस आधी उच्च न्यायालयाच्या सन्माननीय न्यायाधीशानी नगरसेवकांच्या अपात्रतेच्या आदेशाला स्थगिती दिली.
“काँग्रेस नेत्यांचे म्हणणे ऐकून अधिकाऱ्यांनी मंगेश पवार व जयंत जाधव यांचे नगरसेवक पद रद्द केले असले, तरी,” मी मंगेश पवारला महापौर बनवीन आणि काँग्रेसवाल्यांना त्याच्यासमोर हात जोडून उभे करेन. तसेच “अपात्र आदेश जारी करणाऱ्या अधिकाऱ्यालाच मी, महापौरपदाचे प्रमाणपत्र देण्यास भाग पाडेन,” असे आवाहन आमदार अभय पाटील यांनी दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी करून दाखविले.
खासदार जगदीश शेट्टर, विधान परिषद सदस्य सबन्ना तलवार आणि एन. रविकुमार हे देखील भाजप नगरसेवकांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिले होते.
