
कोल्हापूर येथे आयोजित आंदोलनात सहभागी होण्यासाठी हजारोंच्या संख्येने निघालेल्या सीमाभागातील मराठी बांधवांचे महाराष्ट्र विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले . सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीत आपण सदैव तुमच्या पाठीशी राहू , अशी ग्वाही त्यांनी दिली .यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त दाखल करण्यात आला होता.

पोलीस उपाधीक्षक संकेत गोसावी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने सीमा भागातून आलेल्या मराठी बांधवांना मार्गदर्शन करून आंदोलनात सहभागी होण्यासाठी मार्ग करून दिला. यावेळी माजी आमदार के. पी .पाटील, भैया माने, आर. के . पोवार, रविकिरण इंगवले, नविद मुश्रीफ, बाबा पार्टे, युवराज पाटील , विजय देवणे, संजय चितारे, विकास पाटील, निपाणी येथील प्रा. डॉ भरत पाटील, जयराम मिरजकर, प्रशांत नाईक, आनंदा रणदिवे, लक्ष्मीकांत पाटील, राजू बगाळे, गणेश माळी, पिंटू घोडके, पांडूरंग साळोखे, नवनाथ चव्हाण, बाबासाहेब खांबे आणि मविआचे इतर पदाधिकारी सहभागी झाले होते
