
श्री नवदुर्गा माऊलीदेवी सौहार्द सहकारी संस्थेच्या वतीने गुंजी येथील श्री माऊली मंदिर येथे हळदी कुंकुम व तक्रार निवारण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ सोनाली सरनोबत उपस्थित होत्या,

या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना डॉ सोनाली सरनोबत यांनी नियती फाउंडेशन आणि भारतीय जनता पक्षाचे कार्य व भाजप सरकारने केलेल्या योजनांबद्दल माहिती दिली,

त्या पुढे माहिती देताना म्हणाल्या की आपण नेहमीच गरजू आणि गरीबांना मदत करण्यासाठी पुढे असते. खानापूर हा बेळगावातील अविकसित तालुका असल्याने त्याकडे अधिक लक्ष देण्याची व काळजी घेण्याची गरज आहे असे सांगून त्यांनी खानापूर तालुक्यातील सामान्य लोकांसाठी आपण केलेल्या आपल्या कार्याबद्दल माहिती दिली, त्यांनी सांगितले की, खानापूरच्या अबनाळी, गष्टोळी, मोहीशेत, पाली, मेंडिल, सारख्या दुर्गम भागातील गावामध्ये रेशन दुकाने आणि रेशन वितरण केंद्रे व आपल्या प्रयत्नांमुळे जवळपास 37 गावांना त्यांच्या दारात रेशन मिळाले. तसेच वंचित विद्यार्थ्यांना त्यांच्या फी आणि शैक्षणिक शिष्यवृत्तीमध्ये मदत केली असून गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉप दिले आहेत. आपल्या सहकार्याने भाजपचे तक्रार निवारण केंद्र सुरू केले असून त्या द्वारे रेशन कार्ड, श्रम कार्ड, विधवा पेन्शन, उज्ज्वला योजना, समृद्धी योजना, अंत्योदय योजना आदी मिळवून देत असून सर्व सामान्यांच्या समस्यां सोडविण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे सांगितले, समाजातील महिलांनी त्यांचे हक्क आणि कर्तव्ये देखील समजून घेणे आवश्यक आहे,खानापूरमधील महिलांच्या मानसिक, शारीरिक, भावनिक आणि सामाजिक कल्याणाबद्दल तसेच विकासाच्या मुद्द्यांवर भाष्य केले.
आंतरराष्ट्रीय कराटेपटू असलेल्या प्रतिक्षा घाडी हिचा डॉ. सोनाली सरनोबत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि तिला तिच्या खेळाबद्दल ५००० रुपयांचा धनादेश देण्यात आला
व्यासपीठावर डॉ. सोनाली सरनोबत, श्रीमती लक्ष्मी घाडी, श्रीमती सीता घाडी, श्रीमती सुधा घाडी, श्रीमती स्वाती गुरव, रुक्मिणी भेकणे, राधिका दोरकाडी, दीपा पवार, वैष्णवी पाटील, सुधा मानगावकर, राजश्री आजगांवकर, सुभाष घाडी उपस्थित होते, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. विनायक कुलकर्णी यांनी केले यावेळी ५०० हून अधिक महिला उपस्थित होत्या.
अपघातात हातपाय गमावलेले आणि विजया हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करण्यात आलेले श्री. संभाजी अर्जुन पाटील हे कुटुंबातील एकमेव कमावते असल्याने त्यांना नियती फाउंडेशनकडून ११ हजारांची मदत देण्यात आली. शेवटी
सुभाष घाडी यांनी आभार प्रदर्शन केले.
