
जांबोटी : दी जांबोटी बहुउद्देशीय सोसायटी लि., जांबोटी या सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत या संस्थेचे संस्थापक विलासराव बेळगावकर, यांच्यासह एकूण 15 पैकी 15 जागा बिनविरोध करण्यात यश आले आहे.
या निवडणुकीत सामान्य वर्गातून एकूण 9 जागापैकी 9 जागा बिनविरोध करण्यात आल्या आहेत. सामान्य वर्गातून श्री.शंकर रायाप्पा कुडतुरकर,जांबोटी, श्री यशवंत भरमाणी पाटील दारोली, श्री.विद्यानंद वीरभद्र बनोशी खानापूर, श्री.पुंडलिक रामलिंग गुरव गोल्याळी, श्री.पांडुरंग नारायण नाईक कालमणी, श्री.पुंडलिक रामचंद्र नाकाडी बैलूर, श्री.यल्लाप्पा कृष्णाजी बेळगावकर कुसमळी, श्री.खाचाप्पा रामचंद्र काजुणेकर ओलमनी, श्री.हणमंत आप्पाजी काजुणेकर जांबोटी, यांची सामान्य वर्गातून बिनविरोध निवड झाली आहे.
तर सामान्य महिला वर्गातून सौ.गीता विलास इंगळे वडगांव, सौ.सरस्वती अशोक पाटील कापोली केसी, या दोघींची बिनविरोध निवड झाली आहे.
मागासवर्गीय “अ” गटातून श्री.भैरू वाघू पाटील पीरनवाडी यांची तर मागासवर्गीय “ब” गटातून श्री.शाहू कृष्णा गुरव बैलूर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
एस सी वर्गातून श्री.भाऊ सदाशिव कुर्लेकर जांबोटी, व एस टी वर्गातून श्री.भरमाणी रामा नाईक सोनारवाडी, यांची निवड झाली आहे.
निवडणूक झाल्यानंतर संचालक मंडळाची बैठक होवुन. दी. जांबोटी मल्टी-पर्पज को ऑप सोसायटीच्या अध्यक्षपदी श्री विलासराव कृ. बेळगांवकर व उपाध्यक्षपदी श्री पुंडलीक रा. नाकाडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
