
गुंजेनहट्टी : बेळगावसह संपूर्ण कर्नाटक महाराष्ट्र व गोवा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बेळगाव तालुक्यातील गुंजेनहट्टी येथील मंगळवार दि 7 मार्चपासून सुरू होत असलेल्या श्री होळी कामाण्णा देवालयाच्या यात्रो उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून यात्रेतील वाढती गर्दी लक्षात घेऊन वाहनांची पार्किंग व्यवस्था कडोली आणि देवगिरी येथे केली आहे तर यात्रेवर सी सी कॅमेरा द्वारे नजर ठेवण्यात येणार आहे,
सालाबाद प्रमाणे धुलीवंदना निमित्त गुंजेनहट्टी येथील जागृत देवस्थान श्री होळी कामाण्णा देवाची यात्रा यावर्षीही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे, बेळगाव सह महाराष्ट्र कर्नाटक गोवा येथून लाखो भाविक येऊन आपले नवस फेडतात गेली दोन वर्षे कोरोना काळ होता त्यामुळे भाविकांची संख्या थोडी कमी होती पण यावर्षी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा अंदाज देवस्थान यात्रा कमिटीने व्यक्त केला आहे
यात्रा काळात भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे, मंदिरापासून चोहोबाजूनी एक किलोमीटरचे अंतर भाविकांनी व्यापलेले असते शिवाय मंदिर परिसरातील रस्तेही भाविकांनी फुलून गेलेले असतात, तेव्हा या ठिकाणी मंदिर परिसरात वाहने आत येऊन भाविकांना न्हाक त्रास होऊ नये यासाठी कडोली आणि देवगिरी गावाजवळ वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे, मंदिर परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, शिवाय यात्रेवर सी सी टीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे असे मंदिर प्रशासनाने सांगितले आहे, यात्रा काळात वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी विद्युत पुरवठा मंडळांने खास यात्रेसाठी आणखी एक स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर बसवलेला आहे,
होळी कामाण्णा मंदिरासमोर एक भव्य शामियाना उभारण्यात आला असून मंदिर ही विद्युत रोषणाईने सजविण्यात आले आहे, यात्रा दिवसा पार पाडावी या उद्देशाने देवस्थान पंचकमिटीने सकाळी लवकर श्री होळी कामांना मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे निश्चित केले असून सकाळी ठीक 9-00 वाजता भर यात्रेला सुरुवात होणार आहे तेव्हा यात्रा सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी सर्व भाविकांनी सहकार्य करावे असे आव्हान देवस्थान पंच कमिटीने केले आहे शिवाय ज्या ठिकाणी भाविक राहतात त्या ठिकाणीच नैवेद्य दाखवून पूजा करावीत नैवेद्य मंदिराकडे आणू नये असे आवाहन देवस्थान व पंचकमिटीने केले आहे,
