
खानापूर पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर खानापूर-नंदगड मार्गावर करंबळ आणि कौंदल गावच्या मध्ये फॉरेस्ट खात्याच्या वतीने नवीन निर्मिती केलेले चिल्ड्रन पार्क सायन्स पार्क प्रसिद्धीपासून अन्नभीत्त असून नागरिकांनी याकडे दुर्लक्ष केले आहे तसेच फॉरेस्ट खात्याने सुद्धा याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते या ठिकाणी अल्प प्रमाणात नागरिक आपल्या मुलांना घेऊन येत असले तरी म्हणावी तितकी प्रसिद्धी आणि माहिती खानापूर शहर आणि आजूबाजूच्या गावातील नागरिकांना सुद्धा नसल्याने पार्क मध्ये कोणी फीरकत नाही पण आत मध्ये जाऊन पार्क पहाण्यासारखे आहे, सदर पार्कचे उदघाटन तत्कालीन वनमंत्री रमेश जारकीहोळी व वननिगमचे राज्य संचालक सुरेश देसाई यांनी व आदि मान्यवरांनी केले होते,
गेटमधून आत प्रवेश केल्यानंतर फुड स्टॉलची इमारत नजरेनजरेला पडते पण सद्या वर्दळ नसल्याने धूळ खात बंद पडलेली दिसते पुढे गेल्यानंतर लहान मुलांच्यासाठी खेळण्यासाठी व व्यायाम करण्यासाठी वेगवेगळे साहित्य बसविण्यात आलेले असून त्यामध्ये झोपाळा घसरगुंडी पाळणा व इतर व्यवस्था तसेच लहान मुलांना ज्ञान मिळण्यासाठी सायन्स पार्क ची व्यवस्था करण्यात आली असून त्यामध्ये लहान मुलांना सायन्स बद्दल माहिती मिळते, आणि सायन्स बद्यल आवड निर्माण होते, पार्क मध्ये पुरुष व महिलांच्या साठी स्वतंत्र टॉयलेट बाथरूमची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे आपल्या घरून अल्पोहार किंवा जेवणाचा डबा घेऊन दिवसभराच्या पिकनिक साठी गेल्यास दिवस कसा जातो हे समजणार पण नाही पण सदर पार्कची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचली नसल्याने लोकांनी या ठिकाणी पाठ फिरवली आहे, त्यामुळे फॉरेस्ट खात्याने सुध्दा या ठिकाणी देखरेखीसाठी दुर्लक्ष केल्याचे दिसून येते, काही वस्तूं तुटल्या असून त्या बंद अवस्थेत पडलेल्या पहायला मिळतात,
एकंदर प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्यास फॉरेस्ट खात्याने याकडे लक्ष देवुन शाळा, विद्यालय, महाविद्यालय, या ठिकाणी पार्क बद्दल माहिती देवुन प्रसिध्दी केल्यास या ठिकाणी वर्दळ वाढेल व तालूक्यातील एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून नावारूपास येईल यात शंकाच नाही,

कर्नाटक राज्य वननिगमचे संचालक भाजपाचे नेते सुरेश देसाई यांनी या गोष्टीकडे जरा गंभीरपणे लक्ष देवुन पाठपुरावा व प्रयत्न करून संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून योग्य त्या सूचना दिल्यास हे पार्क नक्कीच नावारूपास येईल असे वाटते,
