
खानापूर : नीवडणुक आयोगाने विधानसभा निवडणुकीचे बीगुल फुंकल्यानंतर राज्यभरातील सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले असून, प्रत्येकानी आपापले बरेचसे उमेदवार जाहीर देखील केले आहेत, परंतू अंतर्गत बंडाळी, गटबाजी, व उमेंदवारी मिळविण्यासाठी चाललेल्या चढाओढीमुळे या सर्वात पाठीमागे पडला आहे भारतीय जनता पक्ष, खानापूर तालुक्यात देखील कॉंग्रेस, जेडीएस पक्षाच्या वतीने आपापले उमेदवार जाहीर करून ते निवडणूक प्रचाराला लागले असले तरी भाजपचा उमेदवार अजुन जाहिर केला नसल्याने इच्छुक उमेंदवाराचे पाठीराखे, समर्थक व कार्यकर्ते चौका चौकात थांबुन तर काहीजण वॉटसअँप ला काहि आधार न घेता वाद पेटवीण्याचे लिखाण करून हातात तराजू (तागडी) न घेता याचे पारडे जड त्याचे पारडे जड असे म्हणून तोंडी वजन करत असल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे, आणि इच्छुक असलेले काही उमेदवार पण मलाच उमेंदवारी मीळनार असे बोंबलत सांगत फीरत आहेत,
भाजपची उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकांनी पक्षाकडे अर्ज दाखल करून उमेंदवारी आपल्यालाच मिळावीत यासाठी प्रयत्न चालवीलेले असले तरी काहि मोजकीच नावे बेंगलोर येथून दिल्लीला केंद्रीय समितीकडे पाठविण्यात आली असून त्यातूनच अंतीम उमेंदवार निवडून त्याच्यावर शिक्का मोर्तब करण्यात येणार आहे असे असताना काही अती उत्साही भाजपाचे कार्यकर्ते आणी काही उमेदवारांचे समर्थक आपल्या उमेदवारालाच तिकीट मिळाले असल्याचे सांगून नावे असलेल्या जुन्या यादि, व काटछाट केलेले व्हिडिओ व्हायरल करून संभ्रमावस्था निर्माण करत आहेत पक्षातर्फे पहिली यादि 8 एप्रिल 2023 रोजी तर दुसरी यादी 10 एप्रिलला प्रसिद्ध होणार असल्याने व शेवटच्या क्षणापर्यंत काहीही घडामोडी होवुन कोणालाही उमेदवारी मीळुशकते हा भाजपाचा इतिहास आहे असे असल्यामुळे सर्वानी वादविवाद न घालता पक्ष देईल तो उमेदवार स्वीकारून सर्वानी उमेदवार कोण आहे हे त्याच्याकडे न पहाता पक्षासाठी कार्य केल्यास खानापूरात भाजपाचा उमेदवार विजयी होण्याचा मार्ग सुकर होवु शकतो अन्यथा भाजपाला पुढील काळ कठीण जाणार यात तीळ मात्र शंका नाही,
स्थानिकाना संधी न देता तालूक्याबाहेरची उमेंदवारी लादल्यास त्याचा फायदा निश्चितच म ए समीती व कॉंग्रेसला होणार,
खानापूर विधानसभा निवडणुकीसाठी तालुक्या बाहेरच्या उमेदवारांनी आपल्याला उमेंदवारी मिळावीत म्हणून मागणी केली असुन त्यांनी सुध्दा जोरदार मोर्चेबांधणी केली असुन जर का एखाद्या वेळीस चुकून स्थानीकाना उमेंदवारी डावलून बाहेरच्या उमेदवाराला संधी दिल्यास भाजपाचा 70℅ टक्के मतदार महाराष्ट्र एकीकरण समिती व कॉंग्रेस पक्षाकडे जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे उमेंदवारी जाहिर करताना याचा विचार वरीष्ठ भाजपा नेतेमंडळींनी निश्चितच केला पाहिजे, कारण सद्या महाराष्ट्र एकीकरण समीतीचे वारे युवा वर्गात व तालूक्यातील कोनाकोपऱ्यातील मतदारात वाहु लागल्याने त्याना सुध्दा अच्छे दिन आनेवाले है असे दिसून येत आहे,
