
कोडचवाड येथील चातुर्मास कार्यक्रमास डॉ सोनाली सरनोबत यांनी उपस्थित रहावुन धार्मिक मेळाव्याला संबोधित केले.
त्या म्हणाल्या की जैन धर्म अहिंसा परमोधर्मावर विश्वास ठेवतो आणि जीवनासाठी अत्यंत सौम्य आहे. यावेळी त्यांनी नमोकार महामंत्राचा जप केला. जैन मुनीजींनी त्यांना राजकीय प्रवासासाठी आशीर्वाद दिला. भाजपचे कार्यकर्ता रवी हट्टीहोळी, भरतेश उपाध्ये, महावीर हुडेद, राजू कोचेरी, राजू सागर, परिषा हरोगोप्पा, नवीन कोचेरी, बाहुबली अज्जन्नावर, भरतेश कांची, रवी चौगला, रवी हतट्टीहोळी यांच्यासह स्थानिक नेते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली व त्यानंतर प्रवचन झाले.

