
आज सकाळी चोर्ला घाटात गोव्याहुन बेळगाव ला येणाऱ्या राजस्थान पासिंग असलेल्या धावत्या कारने पेट घेतला असुन संपुर्ण कार जळुन खाक झाली आहे, कारने पेट घेतल्याचे कारमधील लोकांच्या लगेच लक्षात आल्याने ते कार थांबवुन कारमधून बाहेर पडल्याने जीवीत हाणी टळली आहे, सदर घटना खानापूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडल्याने खानापूर पोलीस अधिक चौकशी करत आहेत,
