
बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने हनुमान माला धारण केलेल्या कार्यकर्त्यांनी गांधीनगर खानापूर ते राजा शिवछत्रपती चौक मार्गे श्री राम मंदिर खानापूर पर्यंत मारुतीचे भजन व गीत म्हणत शोभा मिरवणूक काढले,
त्यानंतर रात्री सर्वजन हंम्पी येथील हनुमानचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या पवित्र स्थळाकडे रवाना झाले, यामध्ये बजरंग दल तालूका अध्यक्ष नंदकुमार निटूरकर, बजरंग दल खानापूर संयोजक अमोल परवी, विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष गोविंदराव कीरमीटे रवीगौडा पाटील, व हनुमान माला धारण केलेले कार्यकर्ते उपस्थित होते,
झालेल्या या मिरवणुकीत माजी आमदार अरविंद पाटील, भाजपचे तालूका अध्यक्ष संजय कुबल, भाजपा युवा नेते पंडित ओगले यांनी सहभाग घेतला होता,
