
खानापूर : मलप्रभा नदीतील पाणी प्रतीवर्षाप्रमाने कार्तिक अमावास्येला फळ्या घालून अडवलेले असून पाण्याच्या पात्रात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे त्यामुळे खानापुरातील नागरिक युवा वर्ग स्नान करण्यासाठी व पोहण्यासाठी गर्दी करत असून पहाटेचे हे दृश्य पहाण्यासारखे आहे,
तसेच मलप्रभा नदी ही अत्यंत पवित्र मानली जात असल्याने दूरदूरचे भाविक स्नानासाठी व देव कार्य करण्यासाठी गर्दी करत आहेत तसेच मलप्रभा नदी पवित्र असल्याने मृतकाची रक्षा विसर्जनासाठी सुद्धा पर गावाहून अनेक लोक गर्दी करत आहेत पण नगरपंचायतीने रक्षाविसर्जनासाठी जागेची व्यवस्था न केल्याने ज्या ठिकाणी सध्या पाणी अडवण्यात आले आहे त्या पाण्यातच रक्षा विसर्जन करत आहेत त्यामुळे दूरवरून नदीत स्नान करण्यासाठी व पूजेसाठी येणाऱ्या भाविकांना याचा त्रास होत असून नगरपंचायतीने रक्षा विसर्जनासाठी घाटाच्या त्या बाजूला किंवा मलप्रभा नदी ब्रिजच्या खालच्या बाजूला जागेची व्यवस्था करावीत अशी मागणी खानापुरातील नागरिक व नदीला येणारे भाविक करत आहेत कृपया याची दखल नगरपंचायतीचे नगराध्यक्ष नारायण मयेकर स्थायी कमिटी चेअरमन प्रकाश बैलूरकर चीफ ऑफिसर आर के वटारी व सर्व नगरसेवकांनी घेऊन ताबडतोब रक्षा विसर्जनासाठी जागेची व्यवस्था करावीत,
