
अमरावती : अमरावती जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. प्रभात चौकात एक दोन मजली दुकान कोसळले असुन या दुर्घटनेमध्ये 3 ते 4 जण अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. घटनास्थळी स्थानिक लोक आणि अग्निशामक दलाचे जवान मदतकार्य करत असल्याची माहिती मिळाली आहे,
अमरावतीच्या प्रभात चौकातील राजदीप बॅगचे दुकान कोसळले. यातील ढिगाऱ्याखाली 4-5 जण दबले असण्याची शक्यता वर्तवली जात होती. या ढिगाऱ्याखालुन 4 मृत्यूदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर बाकी लोकांचा शोध सुरू आसल्याचे समजते,
