
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने गेल्या चार महिन्यापासून समितीच्या लढ्यासंदर्भात वेगवेगळ्या आंदोलनाची जनजागृती करण्यासाठी खानापूर समितीचे नेतेमंडळी अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील गावोगावी जाऊन संपर्क करत असताना बऱ्याच गावातील नागरिकांनी गावातील रखडलेल्या विकास कामाबद्दल समितीच्या नेत्याकडे आपली कैफियत मांडली होती हे सर्व ध्यानात घेऊन खानापूर समितीचे नेते आज खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी वीरनगौडर यांच्याबरोबर विविध गावातील विकास कामावर चर्चा केली बऱ्याच गावांमधील शेतीमध्ये जाणारे रस्ते खराब झाले असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे तसेच अतिवृष्टी होऊन बऱ्याच गावातील घरांची पडझड झाली आहे परंतु त्यांना अजून नुकसान भरपाईची रक्कम आतापर्यंत मिळालेले नाही तसेच बऱ्याच गावांमध्ये मोबाईल नेटवर्क असल्यामुळे सरकारतर्फे दिला जाणारा रेशन पुरवठा करण्यात अडचण येते आहे तो सुरळीत करावा अशा बऱ्याच विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात आली येत्या काही दिवसांमध्ये वरिष्ठाकडे सूचना मांडून प्रश्न सोडवण्याचे आश्वासन सीईओ ती विराणगौडर यांनी समितीच्या नेत्यांना दिली यावेळी युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील तालुका पंचायतीचे माझी सभापती सुरेशराव देसाई राजू पाटील वैराळ सुळकर व राजाराम देसाई उपस्थित होते
