
इंडी, दिनांक 27 (प्रतिनिधी) : ऊस वाहू ट्रॅक्टरने क्रुझर वाहनाला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला या अपघातात क्रुझर मधील नऊ जण जखमी झाले आहेत. विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील धुळखेड गावाजवळ हा अपघात घडला आहे. शिवपुत्र शिंदे आणि सुमित्रा शिंदे अशी अपघातात मरण पावलेल्या पती-पत्नीचे नाव आहे.शिवपुत्र शिंदे आणि सुमित्रा शिंदे यासह अन्य काही प्रवाशी क्रूझर प्रवाशी वाहनातून चालले असताना ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने क्रुझरला मागून जोराची धडक दिली आणि यामध्ये शिंदे दांम्पत्य जागीच ठार झाले. झळकी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून जखमींना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
