
गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर ला झालेल्या अपघातात जमखंडी तालुक्यातील एक जण ठार तर 12 जण गंभीर झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी चोर्ला घाटात घडली आहे सदर अपघातात शिवानंद सज्जन, बनहट्टी (वय 36 जमखंडी )असे मृताचे नाव असून याबाबत मिळालेली माहिती अशी की शुक्रवारी दुपारी जमखंडी येथील कुटुंबीय टेम्पो ट्रॅव्हलर ने गाडी नंबर 51 बी 74 71 सहलीसाठी गोव्याच्या दिशेने निघाले होते त्यावेळी चोर्ला जवळील वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वेगात असलेले वाहन रस्त्याकडे ला जाऊन आढळले यात समोर बसलेल्या शिवानंद यांचा जागीच मृत्यू झाला या अपघातात वैभव सज्जन, व्यंकाप्पा नाईक, शिरीष पोतदार, सतीश राठोड ,पार्वती एम, सुरेश एम, लक्ष्मी मिरडे, श्रीशैल के, गायत्री नंदी, महांतेश होसमनी, श्रीदेवी सुतार, एस, अधि जखमी झाले वाळपई पोलीस स्थानकाचे निरीक्षक प्रज्योत फटे यांनी पंचनामा करून अपघाताची नोंद केली आहे
