
मराठा समाजाच्या गरीब विद्यार्थ्यांसाठी बेळगावात वसतिगृह सुरू करण्याची विनंती राज्याचे नगरविकासमंत्री भैरती बसवराज यांना करण्यात आली आहे.
कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषद बेळगावच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच नगर विकास मंत्री भैरती बसवराज यांची भेट घेतली. या भेटीप्रसंगी बेळगाव महानगरपालिकेच्या व्याप्तीतील सदाशिवनगर येथील सर्व्हे क्रमांक 1365/बी, (सीटीएस क्र. 10971) येथील 1 एकर 09 गुंठा जमिनीत भाडेतत्त्वावर मराठा समाजाच्या गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्यात यावे, अशी विनंती मंत्री भैरती बसवराज यांना करण्यात आली. मंत्री महोदयांनी विनंतीला प्रतिसाद देत सदर प्रस्ताव मंत्रिमंडळात घेऊन त्यास मान्यता देण्याचे निर्देश नगरविकास विभागाच्या सचिवांना दिले जातील असे आश्वासन दिले आहे.
