
बेळगाव दि 11 : सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेने आयोजित मालवण येथील सागरी जलतरण स्पर्धेत बेळगाव स्विमर्स क्लब आणि एक्वेरियस क्लबच्या जलतरणपटूंनी सुयश संपादन केले.
प्रौढांच्या विभागात रूपा कापाडिया, प्रसाद परमाज, रोहन हरगुडे, प्रतीक वेर्णेकर, इंद्रजीत हलगेकर, मेघाराणी बी. एम., श्रीकांत देसाई व कौशिक पंडित यांनी आपापल्या गटातून समुद्र जलतरण स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली.
पाखी हलगेकरने – 500 मी. विशेष गटात जलतरण सुवर्ण पदक व वेगवान जलतरणपटू ट्रॉफी, वेदांत मिसाळे याने मुलांच्या पहिल्या गटात 1 कि.मी. जलतरनात सुवर्ण पदक व वेगवान जलतरणपटू ट्रॉफी, अनिश पै याने मुलांच्या दुसऱ्या गटात 1 कि.मी. जलतरण मध्ये सुवर्ण पदक व वेगवान जलतरणपटू ट्रॉफी, सिमरन गोंडाळकर (मुली गट 5 ) – 1 कि.मी. सुवर्ण पदक, शरणया कुंबार ( मुली गट 6 ) – 1 कि.मी. सुवर्ण पदक, अनन्या पै (मुली गट 3 ) – 3 कि.मी. रौप्य पदक, रूपा कापाडिया (महिला गट 8 ) – 3 कि.मी. रौप्य पदक, सुमित मुतगेकर (मुले गट 5 ) – 1 कि.मी. कांस्य पदक, इंद्रजीत हलगेकरने (पुरुष गट 7) -3 कि.मी. मध्ये चौथा क्रमांक, मेघाराणी बी. एम. (महिला गट 7 ) – 3 कि.मी. पाचवा क्रमांक, श्रीकांत देसाई (मुले गट 10 ) – 1 कि.मी. पाचवा क्रमांक, अहिका हलगेकर (मुली गट 1) -1 कि.मी. सातवा क्रमांक, अथर्व राजगोळकरने (मुले गट 1) – 1 कि.मी. सातवा क्रमांक पटकाविला.
वरील सर्व जलतरणपटू शहरातील सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलावात पोहण्याचा सराव करतात. त्यांना जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी, अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितीश कुडूचकर आणि गोवर्धन काकतकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
