
खानापूर : खानापूर तालुक्यातील शिवठाण गावातील 23 वर्षीय युवक ज्ञानेश्वर धाकलू शिरोडकर यांने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे सकाळी 5-30 ते 6-00 वाजण्याच्या सुमारास सदर घटना घरच्या लोकांना समजली,
सदर युवक नंदगड येथील एका अकॅडमीत सैनिकी शिक्षण घेत होता काही दिवसापूर्वी त्याने सैनिक भरती मध्ये भाग घेतला होता व परीक्षा सुद्धा दिली होती पण सदर मिलिटरी परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे सदर घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे
