
हिरेमुन्नोळी : खानापूर तालुक्यातील पारिश्वाड जिल्हा परिषद क्षेत्रात असलेल्या सात ग्रां पंचायत व्याप्तीतील भाजपाच्या शक्ती केंद्र प्रमुख, महाशक्ती केंद्र प्रमुखांची व मतदार यादी पेज प्रमुखांची बैठक भाजपाचे नेते जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्या प्रमुख उपस्थितीत व अध्यक्षतेखाली हिरेमुन्नोळी ता खानापूर येथे संपन्न झाली,
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या योजना किती लोकांच्या पर्यंत पोहोचल्या याची माहिती घेतली व ज्यांच्या पर्यंत पोहोचल्या नाहीत त्यांचीही माहिती घेण्यात आली व संपूर्ण गावात केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजनांची परिपत्रके वाटण्यात आली तसेच प्रत्येक घरावर भाजपच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांचे स्टिकर चिकटविण्यात आले यावेळी भाजपा जनरल सेक्रेटरी बसवराज सानिकोप जिल्हा पदाधिकारी संजय कंची व या भागातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते,

