
शेडेगाळी : खानापूर तालूक्यातील मौजे शेडेगाळी येथील गावच्या नाम फलकाचे अनावरण करण्यात आले. पूर्वीचा नाम फलक हा गेले चार महिन्यापासून जमीन ध्वस्त होऊन पडलेला होता, परंतु या नाम फलकाकडे ग्रामपंचायतचे लक्ष देखील नव्हते. ग्रामपंचायतचे पी डी ओ ना शेडेगाळी गावचे ग्रामपंचायत सदस्यांनी वारंवार निवेदन देऊन देखील त्या नाम फलक उभारण्याची दखल घेतली नव्हती. शेवटी गावातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान च्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन नाम फलकाचे अनावरण करण्याचे ठरवले

व गावातील तरुण वर्गाकडून वर्गणी जमा करून एक सुंदर असा नाम फलक तयार करण्यात आला व त्याचे अनावरण दिनांक 5 फेब्रुवारी रोजी करण्यात आले यावेळी गावातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान चे कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते .गावातील हे तरुणांचे कार्य पाहून गावामध्ये समाधान व्यक्त करण्यात आले आहे,
यावेळी पुढील कोणत्याही कार्याला गावातील तरुण वर्ग पुढाकार घेऊन त्या समस्या सोडवणार असल्याची ग्वाही गावातील सर्व तरुण वर्गाने दिली आहे,
