
खानापूर तालुक्यातील कापोली ग्रामपंचायत व्याप्तीतील जटगे ता.खानापूर येथे विश्व भारती कला क्रीडा फाऊंडेशन बेळगाव यांच्या वतीने रविवार दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी सकाळी ठीक 10-00 वाजता लहान मुलांना अभ्यास शिक्षण ,व्यायाम ,योगा व इतर मैदानी खेळाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने जनजागृती व मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्वांनी बैठकीला उपस्थित राहावेत अशी विनंती विश्वभारती कला क्रीडा फाउंडेशन बेळगावचे लोंढा विभाग कार्याध्यक्ष श्री कृष्णा खांडेकर, रामाक्का हानबर व संस्थेचे अनिल साताप्पा देसाई माजी सैनिक यांनी केली आहे,
