
खानापूर : 24 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी या काळात हैदराबाद तेलंगणा येथील पाचव्या राष्ट्रीय कॅडेट क्योरुगी तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेसाठी गोव्याच्या मुला-मुलींच्या संघाची निवड करण्यात आली असून मुलीच्या संघामधून मूळ चन्नेवाडी ता खानापूर गावचे रहिवासी सध्या राहणार गोव्याचे शिवाजी पाटील यांची कन्या समृद्धी पाटील हिची निवड करण्यात आली आहे त्यामुळे खानापूर तालुक्यातून तीचे अभिनंदन होत आहे,

मुलींचा संघ : समृद्धी शिवाजी पाटील, कनिष्का देवशेकर, मेगन फु्र्तादो, हफिजा सय्यद, शेख इराम कॅरोल, अमिना करनाची, स्नेहा यादव यांची निवड करण्यात आली आहे,
मुलांचा संघ : वेदांत वेर्णेकर, सोहन फर्नांडिस, लॉईड दा कॉस्ता, मोहम्मद अली, रोमिल साधये,कौशिक राठोड, मोहसीन चौधरी, मयंक कुमार, श्रीकांत लामानी, यांची निवड केली आहे या दोन्ही संघांना प्रशिक्षक म्हणून सुनील शर्मा, शिराज खान, असुन संघवस्थापक गिरी काशिनाथ कुर्पासकर व ममता देवी आहेत,
खेळाडूंना व प्रशिक्षकाना तथा व्यवस्थापकांना निरोप देण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला फातुर्डा नेहरू स्टेडियमच्या सभागृहात कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गोवा तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ प्रशिक्षक थेओफिल लोव यांनी संघ जाहीर केले, आमदार लॉरेन्स यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा व्यक्त केल्या असोसिएशनचे सचिव नवीन रायकर यांनी आभार मानले,
मुलींच्या संघामधून निवड करण्यात आलेली समृद्धी शिवाजी पाटील हि A J D अल्मेडा हायस्कूल फोंडा गोवा या ठिकाणी 8 वी च्या वर्गात शिक्षण घेत आहे
