
पीयूसी कर्नाटक राज्य क्रीडा स्पर्धा मंगळूर येथे होऊन कु लक्ष्मण श्रीकांत पाटील गर्लगुंजी ता खानापूर या विद्यार्थ्याने अटलांटिक्स स्पर्धेमध्ये 5000 मिटर कंट्री क्रॉस मध्ये प्रथम क्रमांक मिळवून कर्नाटक राज्याचे गोल्ड मेडल मिळवले आहे त्याचप्रमाणे 3000 मीटर व 1500 मीटर मध्ये सुध्दा उत्तम क्रमांक मिळवला आहे, या विद्यार्थ्याला गर्लगुंजी मराठी शाळेपासून प्रेरणा मिळाली असून श्री अशोक गणपती पाटील गर्लगुजी नॅशनल कोच यांचे मार्गदर्शन तसेच माध्यमिक शाळेतील व पीयुषी मधील सर्व शिक्षक वर्ग पी ई शिक्षक मुख्याध्यापक आणि गर्लगुंजी ग्रामस्थ प्रेमींनी प्रोत्साहन दिल्यामुळे असा हा दिव्य पराक्रम त्याने केला आहे, त्याच्या या कामगिरीमुळे गर्लगुंजी, खानापूर व बेळगाव जिल्हाचे नाव लौकिक झाल्यानें त्याचे सर्वत्र अभिनंदन व कौतूक होत आहे,
