
बेळगाव : माजी विधानपरिषद सदस्य “श्री महांतेश कवटगीमठ सौहार्द सहकारी संघ नियमित बेळगाव” या सोसायटीचा उदघाटन समारंभ राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या शुभ हस्ते उद्या सकाळी ठिक 10-30 वा बेळगाव येथील डॉ जीरगे हॉल जे एन एम सी नेहरू नगर बेळगाव येथे होणार आहे, समारंभाचे अध्यक्षस्थानी डॉ प्रभाकर कोरे माजी राज्यसभा सदस्य व चेअरमन के एल ई सोसायटी बेळगाव हे राहणार आहेत,
उदघाटन समारंभ परमपूज्य जगद्गुरु श्री शिवरात्री देशीकेंद्र महास्वामीजी श्री वीरसिंमहासन महासंस्थान मठ सुत्तूर क्षेत्र मैसूर,
परमपूज्य जगद्गुरु पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी सिद्ध संस्थान मठ निडसोसी, परमपूज्य जगद्गुरु श्री डॉ तोंनताडा सिद्राम महास्वामीजी तोंनतांड्रया संस्थान मठ डांबल – गदग तसेच परमपूज्य श्री डॉ आलम प्रभू महास्वामीजी नागनूर रुद्राक्ष मठ शिवबसव नगर बेळगाव यांच्या दिव्य सानिध्यात संपन्न होणार आहे,

समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून सहकार खात्याचे मंत्री एस टी सोमशेखर माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ विधानसभेचे सभापती बसवराज होरटी तसेच आमदार अनिल बेनके, आमदार अभय पाटील,श्री जी नंजनगौडा अध्यक्ष कर्नाटका राज्य सौहार्द संयुक्त सहकारी नियमित बेंगलोर हे उपस्थित राहणार आहेत,
तसेच या संघाचे अध्यक्ष शरदचंद्र महांतेश कवटगीमठ, उपाध्यक्ष राजेंद्र यल्लाप्पा मुतगेकर, तसेच या संस्थेचे संचालक महांतेश मल्लिकार्जुन कवटगीमठ, प्रमोद सुर्यकांत कोचेरी, लक्ष्मेश फकीराप्पा हुंडेकर, चंद्रगौडा रुद्रगौडा पाटील, डॉक्टर संतोष सुबराव पाटील, सतीश महादेव अप्पाजीगोळ, डॉ विनिता विजयानंद मेटगुडमठ, श्री शिवलिंगय्या महांतय्या शिवयोगीमठ, व श्री अरुण आप्पासाहेब माने, हे संचालक उपस्थित राहणार आहेत,
या समारंभाला खानापुरातूनही कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन या संस्थेचे संचालक भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी केले आहे,
