
गर्लगुंजी : पांडवनगर गर्लगुंजी येथे खासदार नीधितून मंजूर झालेल्या सी सी रस्त्याचा भूमीपूजन कार्यक्रम आज संपन्न झाला,

खासदार अनंतकुमार हेगडे यांच्या खासदार निधीतून गर्लगुंजी येथील पांडव नगर ते मुख्य रस्त्यापर्यंत सी सी रस्ता करण्यासाठी 5 लाख रूपये मंजूर झाले होते त्या कामाचा भुमीपुजनाचा कार्यक्रम भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी व भाजपा तालूका अध्यक्ष संजय कुबल यांच्या हस्ते आज 14 मार्च रोजी संपन्न झाला, उद्यापासून या कामाला सुरूवात होणार आहे, त्यामुळे पांडव नगर गर्लगुंजी येथील नागरिक व रहिवाशांनी आनंद व्यक्त केला आहे,

यावेळी परशराम चौगुले, भरत गोरे, हनमंत मेलगे ग्रा पं सदस्य, शांताराम मेलगे, पांडुरंग भातकांडे, शामराव मेलगे, सर्व ग्रां पं सदस्य, पांडवनगर मधिल रहिवासी व कार्यकर्ते उपस्थित होते,
