
चीरमुरकर गल्ली खानापूर येथील कौलारु घर व घरात असलेल्या टेलर दुकानाला आग लागून मोठे नूकसान झाले आहे, अग्निशमन दल व नागरिकांनी सदर आग विझविली आहे
चीरमुरकर गल्ली ज्ञानेश्वर मंदिरच्या खालच्या बाजूला दिलीप यळूरकर यांच्या घरातील पुढील भागात स्वताच्या भाड्याने दिलेल्या दुकानात रामगुरवाडी ता खानापूर येथील नामदेव नारायण माळवे यांचे टेलर व्यवसायाचे दुकान असून आज सकाळी त्या दुकानाला अचानक शॉर्ट सर्किट मुळे आग लागून

नवीन शिवलेले कपडे, शिवण्यासाठी आलेले कपडे, तसेच दोन शिलाई मशीन, व आदि साहित्य जळून खाक झाल्याने हजारो रूपयांचे नुकसान झाले आहे, तर घर मालक दिलीप यळूरकर यांच्या घरच्या समोरील छत व दुकान जळून त्यांचे सुध्दा हजारो रूपयांचे नूकसान झाले आहे,

अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ त्याठिकाणी धाव घेवुन आग विझवली अन्यथा मोठा अनर्थ घडला आसता, खानापूर पोलीसांनी हि त्याठिकाणी जावुन पंचनामा केला आहे, आज रवीवारचा बाजाराचा दिवस असल्याने नागरिकांनी गर्दी केली होती

