
जागतिक महिला दिन सरकारी संत मेलगे विद्यालय नंदगड येथे साजरा
कर्तुत्ववान व्यक्ती नेतृत्वाची हक्कदार असते. यामध्ये स्त्री देखील आज अग्रेसर आहे. असे प्रतिपादन मुख्य वक्त्या कल्पना गाडगीळ यांनी केले.
बुधवार दिनांक 8/3/2023 रोजी संत मिलगे विद्यालयाच्या प्रांगणात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.
अध्यक्ष स्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री सुरेश मादार उपस्थित होते त्यांनी भारतीय संस्कृतीत स्त्री ला देवी समान मानले जाते. स्वातंत्र्यपूर्वी आपल्या देशातील स्त्रियांची अवस्था दुय्यम होती. परंतु महिला सशक्तीकरणामुळे आज महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत असे प्रास्ताविकपर भाषणात आपले मत व्यक्त केले.
यावेळी शाळेतील महिला शिक्षिका श्रीमती एस बी घाटगे सौ. कल्पना गाडगीळ व संध्या अडली यांचा महिला दिनानिमित्त नंदगड माजी जिल्हा पंचायत सदस्य श्री पुंडलिक कारगेकर यांच्याकडून शाल, हार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शाळेतील स्वयंपाकी व अंगणवाडी कार्यकर्त्या यांचाही सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ शुभेच्छा पत्र देऊन सर्व महिला शिक्षकांचा गौरव केला महिला सबलीकरण विषयी प्रमुख वकत्या सौ.कल्पना गाडगीळ व संध्या अडली यांनी आपले मत मांडले. मुलांकडून विशेष कृती सादर करून महिलांचे प्रश्न अधोरेखीत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रकाश मादार यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री प्रकाश देसाई यांनी केले.*
