
नंदगड : येथील मराठी मुला-मुलींच्या शाळेत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. यानिमित दोन्ही शाळेतील शिक्षिका, मुख्याध्यापिका सौ.मिना उत्तुरकर, शिक्षिका छाया मिटकर, कल्पना बाबलीचे, सविता देसाई, वैशाली पाटील, शकुंतला होसूर यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन तसेच दोन्ही शाळांतील मुलींकडून पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मिना उत्तुरकर यांनी जागतिक पातळीवर महिलांनी आपल्या अस्तित्वासाठी केलेले प्रयत्न व त्यातून भारतातील अनेक महिलांनी केलेले कार्य यातून महिलांना मिळालेली प्रेरणा याबाबत मार्गदर्शन केले.
शिक्षिका वैशाली पाटील म्हणाल्या, महिलांनी सक्षम होणे गरजेचे असून चूल व मूल यामध्येच गुंतून न राहता घरचा उंबरठा ओलांडून बाहेर
पडले पाहिजे. सावित्रीबाई फुले यांनी खडतर परिश्रम करून स्त्री शिक्षणाचा पाया घालून खऱ्या अर्थाने महिलांना सशक्तीकरणाला बळ दिले. पाहिजे. स्वसामर्थ्याची ओळख करून घेऊन वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा महिलांनी प्रयत्न करावा.
शिक्षिका छाया मिटकर म्हणाल्या की, महिला आता सबला बनल्या आहेत. अनेक क्षेत्रे त्यांनी पादाक्रांत केली आहेत. तरीही अजून सामाजिक आणि धार्मिक गुलामगिरीच्या बेड्यांतून त्या मुक्त
झालेल्या नाहीत. शिक्षणामुळे स्त्रिया गुलामगिरीतून मुक्त होतील. त्यासाठी स्त्रियांनी उच्चशिक्षण घेतले पाहिजे
मुख्याध्यापक के. आय. पाटील प्रास्ताविकात म्हणाले, महिला आता कोणत्याही क्षेत्रात मागे राहिल्या नाहीत. विविध क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्वकर्तृत्व सिद्ध करून दाखवत आहेत. शिक्षक एस. बी. बेटगिरी यांनी सूत्रसंचालन केले..
