
खानापूर : आजपासून सी बी एस ई 10 वी च्या परीक्षा सुरू होणार असून खानापूर येथील शांतीनीकेतन पब्लिक स्कूल चे विद्यार्थी आज सकाळी परिक्षेसाठी बेळगाव कडे रवाना झाले, विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी शिक्षक व पालक वर्ग उपस्थित होता,
आज सकाळी 8-00 वा शाळेच्या प्रिन्सिपल स्वाती पाठक (वाळवे) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, यावेळी विद्यार्थी,पालक वर्ग उपस्थित होता, शांतीनीकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांंची परिक्षेची व्यवस्था पीरनवाडी येथील जांबोटी रस्त्याला लागुन असलेल्या के एल एस स्कूलच्या ईमारतीत करण्यात आले आहे


