
हे मातृभूमी तुजसाठी मरण ते जनन तुजवीण जनन ते मरण. प्रखर राष्ट्रवादी विचारांचे स्वातंत्र्यसैनिक स्वातंत्रवीर, विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त हिंदुराष्ट्र सेना तसेच श्री राम सेना बेळगाव यांच्यावतीने बेळगाव हिंडलगा येथील कारागृहाच्या समोर वीर सावरकराच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन तसेच पूजा करून. स्वातंत्रवीर सावरकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली,

ह्यावेळी हिंदुराष्ट्र सेना तसेच श्री राम सेना बेळगाव चे जिल्हा अध्यक्ष श्री रविकुमार कोकितकर , नागेश सराप, परशराम शहापूरकर, अक्षय पाटील, विनायक हांगिरगेकर, संतोष जाधव, रवींद्र सराप, ओमकार गोडसे, मनोज देसुरकर, प्रल्हाद आजरेकर, रवी पार्लेकर, व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होतेl

