
खानापूर : नायकोल (ता खानापूर) गावचा सुपूत्र व मद्रास इन्फंट्रीचा भारतीय सैनिक यशवंत सहदेव गावडा (वय ३३) याचा दिल्लीत सेवेत असताना आजाराने सोमवार दि 27 रोजी दु खद निधन झाले.p

यशवंत गावडा हे 2008 मध्ये मद्रास इफंन्ट्री मध्ये भरती झाले होते. जवळपास १४ वर्षे सेवा बजावली. यामध्ये जम्मू, दिल्ली, राजस्थान आदी ठिकाणी सेवा बजावली आहे. भारतीय सैनिक म्हणून नायकोल गावात पंचक्रोशीत यशवंत गावडा परिचित होते,
ते नुकताच सुट्टीवर नायकोल गावात येऊन गेले होते, काही दिवसांपूर्वी त्याना आजाराने ग्रासले होते. त्यात आजार वाढत गेल्याने. सेवेत असतानाच दिल्ली येथील आर आर हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना उपचाराला प्रतिसाद मिळाला नसल्याने सोमवारी दि 27 रोजी त्याचे दु खद निधन झाले.
त्याच्या पश्चात पत्नी, चार वर्षांचा मुलगा, आई, भाऊ, वहिनी असा परिवार आहे.
