खानापूर : बेळगाव ते गोवा हद्दीपर्यंत चोर्ला रस्त्याची चाळण झाली असून वाहन चालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत असून त्याचबरोबर वाहने नादुरूस्त होत असून अपघाताचे प्रमाण ही वाढले आहे गोव्याला जाताना गोवा हद्दीपर्यंत कर्नाटक राज्याच्या व्याप्तीतील रस्ता भयानक खराब झाला असून सदर रस्ता खानापूर तालुक्याच्या क्षेत्रातून जातो, सदर रस्त्याची ताबडतोब दुरूस्ती करण्यात यावीत अशी मागणी या रस्त्यावरून कायम प्रवास करणारे कुपटगीरी गावचे सामाजिक कार्यकर्ते जोतीबा पाटील यांनी केली आहे,
तसेच रस्त्याच्या परीस्थिती बद्दल चित्रीकरण करून व्हिडिओ सुध्दा त्यांनी पाठविला आहे, निवडणूक आली की मताच राजकारण करणाऱ्या सगळ्या पक्षाच्या नेतेमंडळीनी सुध्दा याकडे लक्ष द्यावेत अशी मागणी प्रवासी वर्गातून करण्यात येत आहे,