
बेळगाव : बेळगाव हा केवळ मोठा जिल्हा नसून महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या सीमेला लागून असल्याने अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक व सेवन रोखण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिल्या. अमली पदार्थांची विक्री व वाहतूक नियंत्रणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आज शनिवारी आयोजित विविध विभागांच्या समन्वय समितीच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानी होते.
अंमली पदार्थ रोखण्यासाठी कृषी, वन, आरोग्य आणि पोलीस विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत सावधगिरीने काम करावे. सर्वत्र दक्षता बाळगावी, अशा सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिल्या.
अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री रोखण्याशी संबंधित अनेक गुन्हे पोलीस विभागाने नोंदवले आहेत. याशिवाय गांजाचे पीक व गांजा व इतर नशेची वाहतूक शोधून काढण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.संजीव पाटील यांनी सांगितले.
शैक्षणिक संस्थांमध्ये अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करावी.
वसतिगृहांची तपासणी करावी. महामार्गालगत असलेल्या ढाबा आणि हॉटेल्सवर लक्ष ठेवावे.
गांजा पिकाची शेतातील माहिती गोळा करावी.
डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कोणत्याही प्रकारचे औषध विकले जाणार नाही याची काळजी घ्यावी.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.संजीव पाटील म्हणाले की, युवकांमध्ये अमली पदार्थ सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करावी असेही डॉ.संजीव पाटील यांनी सांगितले.
पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या म्हणाले, “अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री रोखणे हे केवळ पोलीस विभागाचे काम मानू नये. उत्पादन शुल्क, वन, कृषी, आरोग्य आदी विभागांनीही समन्वयाने काम करावीत. या संदर्भात पोलीस विभागाला अमली पदार्थाबाबत कोणतीही माहिती त्वरीत पोलीस विभागाला द्यावी, असेही ते म्हणाले.
डीएफओ हर्षभानू यांच्यासह कृषी, वन, आरोग्य, शिक्षण यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते
