
बरगांव : बरगांव गावात निकृष्ट दर्जाचे सीडी वर्क बांधकाम करण्यात आले असून त्याची चौकशी करून संबंधित बांधकाम कंत्राटदार व संबंधित ग्रां पं अध्यक्ष व सदस्यांची चौकशी करण्यात यावीत अशी मागणी बरगाव गावचे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सुतार यांनी केली आहे,

खानापूर तालूक्यातील बरगांव ग्रां पंचायतीत येत असलेल्या बरगांव गावात सहा महिन्यापूर्वी गावच्या प्रवेशद्वारावरील गटरवरती सीडी वर्क (स्लँब) घातले होते ते बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याने खड्डे पडण्यास सुरूवात झाली असल्याने या ठिकाणाहून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना व विद्यार्थ्यांना याचा त्रास होत असून काही विद्यार्थ्यांचे पाय त्या खड्ड्यात गेल्याने किरकोळ दुखापत सुध्दा झाली आहे, पुढे मोठी दुर्घटना घडण्याआगोदरच वरिष्ठांनी या बांधकामाची चौकशी करून संबधितावर कारवाई करून सदर निकृष्ट दर्जाचे बांधकाम संबधिताकडून नवीन करून घ्यावेत व सदर कंत्राटदाराची लायसन्स रद्द करावीत अशी मागणी बरगांव गावचे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सुतार यांनी केली आहे,

तालूक्यात सगळीकडे असेच प्रकार चाललेले असून सरकारी बांधकामात सर्वत्र टक्केवारीचे प्रमाण वाढले असून सर्वत्र बांधकाम ठेकेदार निकृष्ट दर्जाची कामे करत असल्याचे दिसून येत आहे, बांधकाम पूर्ण झालेल्या दोन ते सहा महिण्यात रस्ते असू देत नाहितर सीडी वर्क असू देत खड्डे पडत आहेत, एकंदर तालुक्याचे तीन तेरा नऊ अठरा वाजले आहेत, कुंपनच शेत खात असल्याने नागरिक बुक्याचा मार सहन करत आहेत,

