
देशभरात श्रीराम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला, खानापूर शहर व तालूक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी सुध्दा श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, खानापुरातील चौराशी मंदिर खानापूर या ठिकाणी समस्त सूर्यवंशी छत्रीय कलाल समाजातर्फे श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात साजरी करण्यात आली,

यावेळी क्षत्रिय सूर्यवंशी कलाल समाजाचे नरेश जोरापूर, ओमकार हॉटेलचे मालक सामाजिक कार्यकर्ते राजू पासलकर, सामाजिक कार्यकर्ते अमर जोरापुर, आण्णा तपासकर, सुनील पारिशवाडकर, हरीश कलाल, किशोर कलाल, नगरसेवक आप्पय्या कोडोळी, नागराज कलबुर्गी, राकेश तपासकर, दिनेश मोरेकर, संजय भुतकी, विठ्ठल हळदणकर, आणि कार्यकर्ते उपस्थित होते,

श्रीराम मंदिर खानापूर येथेही श्री राम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला
श्री मलप्रभा नदी तीरावर असलेल्या श्रीराम मंदिरात फार पूर्वीपासून परंपरागत श्रीराम नवमी उत्सव साजरा केला जातो मंदिराचे मालक श्री उल्हास उर्फ आर पी जोशी हे गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत पुणा, मुंबई दूरदूरच्या कीर्तनकारांना बोलावून खानापुरातील भाविकांना कीर्तनाचे श्रवण करण्याचे आयोजन करत असतात रामनवमी दिवशी दुपारी ठीक बारा वाजता प्रभू श्री रामांच्या मूर्तीला पाळण्यात घालून पाळणा म्हणून जन्मोत्सव साजरा केला जातो दिवसभर त्या ठिकाणी दर्शन व प्रसाद घेण्यासाठी भाविकांची गर्दी असते त्यानंतर उत्सवाची समाप्ती होते यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करण्यात आला महिला वर्गाची उपस्थिती मोठ्या प्रमाणात असते,
