
खानापूर : राज्यात गेल्या दोन-चार दिवसापासून पदवी महाविद्यालयाची परीक्षा सुरू आहे पण खानापूर येथील मराठा मंडळ आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांची हॉल तिकीट न आल्याने संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यास देण्यात आले नाही त्यामुळे त्यांचे एक वर्ष वाया जाणार असल्याने संबंधित विद्यार्थी तणावाखाली असून कोणत्याही क्षणी आपल्या जीवाला बरे वाईट करून घेण्याची शक्यता आहे त्यांचे पालक त्यांच्यावर नजर ठेवून आहेत पण पुढे काही विपरीत घडल्यास याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल सदर विद्यार्थ्यांचे पालक वर्ग करत आहेत परीक्षेची संपूर्ण ऑनलाईन फी भरलेली असली तरी कॉलेजचे कर्मचारी तुम्ही फी भरली नसल्याने हॉल तिकीट आले नसल्याचे खोटे सांगत आहेत वास्तविक संपूर्ण फी आम्ही ऑनलाइन भरलेली आहे आणि त्याचा पुरावा देखील आमच्याकडे आहे असे पालक गजानन कुंभार व रवी नंदगडकर सांगत आहेत,
खानापूर तालुक्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत बऱ्याच विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली प्रकरणे ताजी असून यावर मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा राजश्री हलगेकर यांनी ताबडतोब चौकशी करून संबंधित व्यक्तीवर सक्त कारवाई करावीत व सदर विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावात अशी मागणी खानापूर तालुक्यातून होत आहे,
हे प्रकरण अतिशय गंभीर असून संस्थेच्या स्टाफ ने हॉल तिकीट का आले नाही त्याची चौकशी युनिव्हर्सिटीकडे केलीच नाही जर का या अगोदर चौकशी केली असती तर त्यातून मार्ग निघाला असता परंतु त्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते, जर का या प्रकरणात विद्यार्थ्यांच्या जीवाला बरे वाईट झाल्यास संबंधित संस्थेचे कर्मचारी व संस्था जबाबदार राहील याची त्यांनी नोंद घ्यावीत व यातून ताबडतोब मार्ग काढून त्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी तालुक्यातील नागरिकांतून मागणी होत आहे

Clg staff ni yabddl University kde jaun tynna mulanchi adchan n mulanch bhavishyavr honara anyay dekhil smjun sngitlela ahe pn kontyahi goshtichi shahanisha na karta sambandhit sawnsthevar kinvha staff vr sarv paristhithi smjun ghyaycha adhich arop karan yogya nahi ahe ya Sarv prakarabddl RCU University mdhe jaun purepur paristhithi samjaun gheunch samandhitanvr arop karave
Vidhyarthancha bhavishyachi chinta hi palkanpramech shikshkanchi hi titkich aste tyamule kontyachi mulach nuksan bhav hi bhavna nirman hone shakyach nahi kahi tantrik adchan asel kinvha ankhin kahi asel pn yavar yoghya ti mahiti uplabdh karane mahtvache ahe karan prashn vidhrthi ani shikshak doghanchahi ahe