
खानापूर : खानापूर-पारीश्वाड मार्गावर तोपिनकट्टी गावातून विटा भरून जात असलेला टेम्पो क्रमांक के एल 59 – 74 49 या टेम्पोला अपघात होऊन सदर अपघातात वीट कामगार इब्राहिम फैयाज मुन्नोळी (वय 27 वर्षे) राहणार देवलती ता खानापूर,याचा जागीच मृत्यू झाला तर ड्रायव्हर महीबूब राजेसाब सनदी यांने अपघाताची कल्पना येतात उडी मारल्याने तो थोडक्यात बचावला आहे त्याला साधी जखम सुद्धा झाली नाही तसेच आणखी एक मंजू (वय वर्षे 26) नावाच्या कामगाराला किरकोळ दुखापत झाली असल्याने त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे खानापूर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शल्यचिकित्सेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र खानापूर या ठिकाणी पाठवण्यात आला आहे पुढील चौकशी खानापूर पोलीस करत आहेत

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सदर टेम्पो देवलती गावचा असून तोपीनकट्टी गावात विटा भरून पारिषवाड कडे वीटा उतरण्यासाठी जात असताना उतारतीला एका वळणावर एक मोटार सायकल स्वार अचानक समोर आल्याने ड्रायव्हरने ब्रेक मारला असता अचानक ब्रेक लायनर जाम होऊन टेम्पो एक बाजूला वळला व खड्ड्यात पडून सदर अपघात घडल्याचे समजते,

