
लोंढा ते गुंजी रेल्वे मार्गावर रेल्वेचे द्वीपदरीकरन करण्यात येत असल्याने खानापूर ते लोंढा रामनगर मार्गावर लोंढा नजीक असलेले रेल्वे फाटक दि 4 जानेवारी व 5 जानेवारी 2023 असे दोन दिवस बंद राहणार असल्याने नागरिकांनी व प्रवाशांनी ईतर पर्यायी मार्गाचा अवलंब करावेत असे हुबळी रेल्वे विभागाचे उप मुख्य अभियंता यांनी कळविले असून त्याची माहिती त्यांनी तहसीलदार खानापूर, पीएस आय खानापूर, के एस आर टि सी डेपो मॅनेजर खानापूर,शशीधर बीएस एस एस ई वर्कस फॉर इन्फॉर्मेशन विभाग तसेच बांधकाम विभागाचे चीफ इंजिनीयर यांना दिले आहे,
राजेंद्र रायका यांचे आवाहन
म्हणून प्रवासी व नागरिकांनी दिनांक ४ जानेवारी व ५ जानेवारी हे दोन दिवस पर्यायी मार्गाचा अवलंब करावेत असे आवाहनही सामाजिक कार्यकर्ते व भाजपा मीडिया सेलचे प्रमुख राजेंद्र रायका यांनी केले आहे,
