
खानापूर : खानापूर शहरात विधानसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खानापूर शहरातून केंद्रीय पोलीस अर्ध सैनिक दल व खानापूर पोलीस यांच्या वतीने खानापूर शहरात पतसंचलन करण्यात आले,
स्टेशन रोड लक्ष्मी मंदिर जवळ पथसंचलन आले असता लक्ष्मी मंदिर येथे भाजपा युवा नेते पंडीत ओगले व युवा कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत केले व भारत माता की जय च्या घोषणा दिल्या या पथसंचलनात खानापूर पोलीस ठाण्याचे पोलीस इन्स्पेक्टर रामचंद्र नायक, नंदगड ठाण्याचे पोलीस इन्स्पेक्टर तसेच पीएसआय प्रकाश राठोड तसेच केंद्रीय दलाचे मुख्याधिकाऱ्यांनी यात भाग घेतला होता,


